चेन्नई येथे धावत्या कारमध्ये तिघांनी केला तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न

gang-rape

चेन्नई (तामिलनाडू) : धावत्या कारमध्ये तिघांनी एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास चेन्नईत ही घटना घडली. धावत्या कारमधून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर श्रीलंकन उच्चायुक्ताजवळ तैनात पोलीस कर्मचारी सतर्क झाले. पोलिसांनी लगेच पाठलाग करून कार अडवली. त्यातील दोन आरोपी फरार झाले. तर एका आरोपीला अटक करण्यात आली.

श्रीलंकन उच्चायुक्ताजवळ तैनात पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास एका धावत्या कारमधून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. ते ऐकून पोलीस तात्काळ सतर्क झाले. त्यांनी कारचा पाठलाग करून अडवले. या कारमधून एक महिला खाली उतरली. तिने पायातून चप्पल बाहेर काढली आणि कारमध्यये बसलेल्या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गौतम नावाच्या तरूणाला अटक केली. तर इतर दोन आरोपी पळून गेले.

नुंगबकम पोलिसांनी या घटनेची चौकशी केली. पीडित तरूणी ही २३ वर्षीय असून, ती व्यापारी आहे. नुंगबकम येथे एका पार्टीत सहभागी होण्यासाठी ती गेली होती. तेथून परतताना गौतम, दीपक आणि शकित नावाच्या तरुणांनी तिला घरी सोडतो असे सांगितले. मात्र, या तरूणांनी त्याचा गैरफायदा घेतला. धावत्या कारमध्ये या तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेची सुटका करण्यात आली. आरोपी वेल्लोर येथील रहिवासी असल्याचे कळते. एका आयटी कंपनीत ते तिघेही काम करत असल्याचे समजते. या प्रकरणी नुंगबकम महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here