महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचे सेक्स रॅकेट; विद्यार्थिनीने केला आरोप

पीलीभीत (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यातील महिला महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने प्राध्यापकावर सेक्स रॅकेट चालवत असून, त्यात त्याची पत्नी व अन्य काही विद्यार्थिनीही साथ देत असल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू केली आहे.

 

या विद्यार्थिनीने प्रा. कामरान आलम खान याने आपल्याशी दुष्कर्म केले, तो आपली सतत छेड काढतो आणि धमकावतो, असे या विद्यार्थिनीने तक्रारी म्हटले आहे. पण अन्य कोणीही विद्यार्थिनीने कामरान खान याच्याविरोधात अद्याप तक्रार केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.प्राध्यापक खान घरात बोलावून जादूटोणा करतो, सेक्स टॉइजविषयी बोलत राहतो आणि दहशतवादी संघटनांच्या नावाने आम्हाला धमकावतो, असेही या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे.

 

प्राध्यापक ज्या वर्गात शिकवत असे, तो वर्ग सील करण्यात आला आहे. तो शिकवत असे त्या महाविद्यालयात ४५० विद्यार्थिनी शिकतात. तरीही तेथे एकही महिला शिक्षक वा कर्मचारी नसल्याबद्दल आणि सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here