पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : वारजे माळवाडी परिसर पुन्हा हादरला असून, खुनातून शांतता होत असतानाच मध्यरात्री अमर ब्रिजजवळ असलेल्या झोपडपट्टीत गोळीबार झाला आहे. पहाटे हा गोळीबार झाला असून, यामुळे पुन्हा दहशत पसरली आहे.
या गोळीबारात अमर चव्हाण (वय ३४) हे जखमी झाले असून, याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्लेखोर पसार झाले आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, अमर ब्रिजजवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरात राहतात. दरम्यान ते पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरातून लघुशंका करण्यासाठी बाहेर आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. यात एक गोळी त्यांना लागली असून, त्यात ते जखमी झाले आहेत.






