मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : अंबोली परिसरातील मित्राच्या वाढदिवसाला पत्नीला नेऊन पतीने मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे.

अंबोली परिसरातील मित्राच्या घरी वाढदिवसानिमित्त पीडितेला पतीने नेले. त्यानंतर तिला पाण्यातून ड्रिंक दिल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर पतीने तिच्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

या घटनेची माहिती कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेला देण्यात आली. त्यानंतर पीडितेने पतीसोबत भांडण करून घर सोडले आणि ती माहेरी निघून गेली. तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीसह दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here