पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीत मंगळवारी (दि.७) केली.
पोलिसांनी या प्रकरणी समीर प्रकाश कोतवाल (वय-३४ रा. वॉचमेकर चाळ, भवानी पेठ पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक बाळासाहेब सकटे यांना माहिती मिळाली की, भवानी पेठेतील एका व्यक्तीने चोरी करण्यासाठी पिस्टल आणले आहे.
पोलिसांनी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त चौकशी केली असता रॉबरी करण्यासाठी पिस्टल आणल्याची कबुली आरोपीने देली. आरोपी विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.






