अहमदनगर जिल्ह्यात शेळ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape-on-minor

अहमदनगर (प्रतिनिधी) : ओढ्याच्या शेजारी शेळ्या चारत असलेल्या अल्पवयीन मुलीला ओढ्यात घेवुन जावुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी ९ डिसेंबरला नगर तालुक्यात घडली.

झालेला प्रकार पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने शुक्रवार, १० डिसेंबरला रात्री पावणे बारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अत्याचार करणारा मस्ताराम (पुर्ण नाव समजू शकले नाही, रा. साईबन जवळ, निंबळक शिवार ता. अहमदनगर) याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६ (२) (आय), बाल लैगिक अत्याचार अधि.२०१२ चे कलम ४, ५ ,(एम)/६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, १० वर्षाची अल्पवयीन मुलगी गुरूवारी नगर तालुक्यातील एका गावातील ओढ्याच्या शेजारी शेळ्या चारत होती. दुपारच्या वेळी मस्तारामने त्या अल्पवयीन मुलीला ओढ्यात घेवुन जावुन तिच्यासोबत बलात्कार केला. यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईला झालेल्या प्रकार सांगितला. आईने शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून मस्ताराम विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मस्ताराम पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here