माथेरानमध्ये महिला पर्यटकाचा गळा चिरून खून

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : माथेरान येथील इंदिरानगर परिसरामध्ये एका महिला पर्यटकाचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघड झाली असून, खून करणाऱ्याने या महिलेचे शिर कापून नेले आहे.

माथेरानमधील इंदिरानगर परिसरात शनिवारी एक जोडपे सायंकाळी राहण्यासाठी आले होते. लॉजच्या मालकाने त्यांची नावे नोंदवून खोली भाड्याने दिली होती. रविवारी सकाळी जेव्हा या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड पलंगाखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले.

मृत महिलेचे आरोपीने शिर सोबत घेऊन गेल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहेत. लॉजच्या नोंदवहीत महिलेचे रुबिना बेन व सोबत असलेल्या व्यक्तीचे अमजद खान अशी खोटी माहिती भरली असल्याचे उघड झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here