पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरामध्ये तृतीयपंथीयाचा खून

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 4 तासात ‘पर्दाफाश’; मर्डरचं कारण आलं समोर

 पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : – नगर महामार्गाजवळील शिक्रापूर  येथील बजरंगवाडी  येथे रस्त्यालगत एका तृतीयपंथीयाच्या खूनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार तासात उलघडला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. आशु ऊर्फ आनिश रामानंद यादव (वय २३, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर ) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणी धर्मु जोहीतराम ठाकूर  (वय २०), युगल लालसिंग ठाकूर (वय १९, दोघे रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर, मुळ गाव ढाबा, ता. डोंगरगाव, जि. राजनंदगाव, छत्तीसगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

शिक्रापूर परिसरातील तोरणा हॉटेलसमोरील हरीष येवले यांच्या प्लॉटिंगलगत मोकळ्या जागेत एका तृतीयपंथीयाचा मृतदेह रविवारी सकाळी १० वाजता आढळून आला होता. आशु असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला शेवटचे कोठे पाहण्यात आले, याची परिसरातील लोकांकडे चौकशी करण्यात आली आहे. त्याआधारे तो धर्मु ठाकूर व युगल ठाकूर यांच्याबरोबर असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांचा शोध सुरु केल्यावर ते गावाला पळून जाण्याच्या तयारी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी शिक्रापूर-चाकण चौक  परिसरात दोघांना पकडले.

 

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खून  केल्याची कबुली दिली.
हे तिघेही खून केलेल्या ठिकाणाजवळ दारु पित बसले होते. धर्मु याने आशु याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. पैशाचे देवाण घेवाणीतून त्यांच्यात वाद झाला. दारुच्या नशेत त्यांनी आशुचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
पुढील तपासासाठी दोघांना शिक्रापूर पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here