पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला व्हिडीओ कॉल करून नग्न होण्यास भाग पाडले आणि त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
आयान अशपाक खान ( वय 19) आणि नवनाथ संभाजी गिरी (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयान खान याने पीडित तरुणीला जबरदस्तीने व्हिडीओ कॉल केला आणि तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचे स्क्रीनशॉट काढून घेत व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला बोलावून घेत दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.






