दुकानदाराच्या डोक्यात‎ फोडली बियरची बॉटल, तिघांना १४‎ दिवसांची कोठडी

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : अमळनेर येथील गांधलीपुरा भागात किराणा दुकानांवर घेतलेल्या मालाचे‎ पैसे मागितल्याचा राग आल्याने‎ तीन जणांनी दुकानदाराच्या डोक्यात‎ बियरची बाटली मारली.तसेच‎ चाकूने बोट तोडल्याची घटना ११‎ रोजी रात्री घडली.यातील‎ ३ आरोपींना अटक करून‎ न्यायालसमोर हजर केले असता १४‎ दिवसांची कोठडी सुनावली.‎

रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या‎ गांधलीपुरा भागातील किराणा‎ दुकानांवर पैलाड येथील रोशन राजेंद्र‎ पाटील,यशवंत प्रकाश पाटील,‎विजय राजेंद्र पाटील हे तिघे दारू‎ पिऊन दुकानात आले.

त्यांच्या‎ हातात बियरची बाटली होती. त्यांनी‎ पाण्याची बाटली, कुरकुरे व सिगारेट‎ मागितली. त्यानंतर ते तिघे तेथून‎ निघून जात असताना मालक रवींद्र‎ यांनी मालाचे पैसे मागितले. त्याचा‎ राग आल्याने तिघांनी शर्टाची कॉलर‎ पकडून दुकानदाराला शिवीगाळ व‎ मारहाण केल्याचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला होता. १३ रोजी‎ तिघांना पोलिसांनी अटक करून‎ न्यायालायासमोर हजर केले. त्यांना‎ १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी‎ सुनावण्यात आली. त्यानंतर तिघांना‎ जिल्हा कारगृहात पाठवण्यात आले.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here