अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; 12 तासात महिलेसह दोघांना अटक

arrested

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील चाकूर येथील एका तरुणांची अष्टामोड शिवारात हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी समोर आली.दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात तिघाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील हणमंत व्यंकटी येरवे (४२) यांचे लातूररोड येथील शबाना मासुलदार हिच्याशी शारिरिक संबंध होते. परिणामी, शबाना, मुलगी आणि पती हे गत दहा वर्षापासून विभक्त राहत हाेते. कालंतराने हणमंत हा शबानाला दारू पिऊन त्रास देत हाेता. शबाना सततच्या त्रासाला कंटाळली होती. शबानाशी संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि शबाना यांच्यातील अनैतिक संबंध वाढत गेले. हणमंत याच्या वाढत्या त्रासाला कंटाळून शबाना आणि संतोष यांनी हणमंत येरवे याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार शबानाने हणमंतला रविवारी सायंकाळी दुचाकीवरुन चाकूर येथे घेऊन गेली. लातूररोड नजीकच्या एका धाब्याजवळ दुचाकी सोडण्यात आली. तेथून आष्टा शिवारातील घरणी रेल्वे स्टेशन समोर ते गेले. त्यावेळी शबानाने मोबाईलवरुन एका व्यक्तीशी संपर्क केला. त्या व्यक्तीने हणमंत याच्याशी चर्चा केली. तेथून ते मोहदळ भागातील अडवळणावर हे गेले. तेथे दबा धरुन बसलेल्या संतोष धोंडीराम घाडगे (२५ रा. शिवणखेड ता. चाकूर) आणि लक्ष्मण बब्रुवान डांगे (३८ रा. आष्टा ता. चाकूर) यांनी हणमंत येरवे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. डोक्यात लोखंडी रॉडने जबर वार करुन हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी एका शेतकऱ्यांने मृतदेह पाहून पाेलिसांना कळविले. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम, पोलिस निरिक्षक बालाजी मोहिते यांनी भेट देवून पाहणी केली.

याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत बारा तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. याबाबत शबाना मासुलदार, लक्ष्मण डांगे आणि संतोष घाडगे याला अटक करण्यात आली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here