अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी पाच महिन्यांची गरोदर

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यात अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत नेवाळेवस्ती, चिखली येथे घडला. कुणाल (वय अंदाजे 25, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने 15 डिसेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या घरी एकटी असताना आरोपी घरात आला. त्याने घराचा दरवाजा बंद करून मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here