अश्लील फोटो व्हायरल करण्याची देत तोतया डॉक्टरने तरुणीसोबत केलेअत्याचार

doctor

औरंगाबाद (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका तरुणीला गुंगीचे औषध देऊन तोतया डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला आहे.आरोपी तोतया डॉक्टरचे नाव नेवाकुमार मंडल असे आहे. आरोपी नेवाकुमार मंडल हा मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे. त्याने साई क्लिनीक नावाने दवाखाना उघडला होता.

 

 

काही महिन्यांपूर्वी त्याच्या दवाखान्यामध्ये पीडित तरुणी उपचारासाठी आली होती. तेव्हा या आरोपी डॉक्टरने तरूणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्याचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. यानंतर त्याने हे फोटो व्हायरल करायची धमकी देत तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले आहेत. याची माहिती पीडित तरुणीच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी या आरोपी डॉक्टरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

यानंतर इस्लापूर पोलिसांनी या आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती या आरोपीला समजताच तो फरार झाला आहे. पोलिसांकडून या आरोपी डॉक्टरचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here