लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : मित्राने मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला भोसरी आणि लातूर येथील लॉजवर नेऊन तसेच ट्रॅव्हल्स बसमध्ये तब्बल नऊ ते दहा वेळेस लैंगिक अत्याचार केला. ही घटना विश्व विलास लॉज भोसरी, लातूर येथील लॉज आणि लांडेवाडी भोसरी येथील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रॅव्हल्स बसमध्ये घडली.

 

तेजस तात्याराव सरवदे (वय 20, रा. वसवडी, जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने बुधवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजस आणि पीडित तरुणी हे मित्र मैत्रीण आहेत. तेजस याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला लांडेवाडी येथील विश्वविलास लॉजमध्ये आणि लातूर येथील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लांडेवाडी येथील भोसले पार्किंगमध्ये तेजस याने त्याच्या मालकीच्या ट्रॅव्हल्स बसमध्ये नेऊन देखील तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तब्बल नऊ ते दहा वेळा हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तेजसला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here