वाशिममधील धक्कादायक घटना; वेद शिक्षकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : शहराच्या मध्यवस्तीत वसलेल्या गुरुमंदिर संस्थानच्या वेद पाठ शाळेत वेद मंत्रांचे शिक्षण देणाऱ्या नराधम गुरुजीने १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य करून गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला.

याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी शहर पोलिसांत दाखल तक्रारीवरून आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुमंदिर परिसरात असलेल्या वेद पाठशाळेत वेद मंत्रांचे शिक्षण देणारा अजय भगवानराव पाठक (४४) याने अल्पवयीन १३ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद मुलाच्या वडिलांनी कारंजा शहर पोलिसांत दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३७७, ५०६, ४, ६ व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. या घटनेची शहरभरात चर्चा असून, सर्वच स्तरांतून निषेध नोंदविला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here