संशयी पत्नीने पतीस करायला लावला शेजारच्या मुलीवर बलात्कार

वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) : जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात संशयी वृत्तीच्या पत्नीने पतीला शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करावयास लावल्याची घटना आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या पती-पत्नीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन पीडिता आणि पती-पत्नी शेजारी राहतात. १४ वर्षीय अल्पवयीन पीडिता घरात एकटी होती. यावेळी आरोपी महिलेने तिला घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी आली. त्यानंतर महिलेने तिला तू माझ्या पतीसोबत लग्न कर आणि त्याच्याशी संसार कर, असे म्हटले. त्यानंतर ती दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेली. अल्पवयीन मुलीशी पतीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयाने हे घृणास्पद कृत्य करावयास लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपी पतीने पीडितेवर एकटी असल्याचा आणि पत्नीच्या बोलण्यावरून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर आरोपीची पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पुन्हा पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या घृणास्पद कृत्यानंतर पीडितेला घडलेल्या घटनेबद्दल कोणाला सांगिल्यास जीवानिशी मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर स्वतःची सुटका होताच पीडितेने आपबीती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी आर्वी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पती-पत्नी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करत पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here