सासऱ्याने तलवारीने कापले सुनेचे दोन्ही हात

father-in-law-cut-daughter-in-law-hand-by-sword

विदिशा (मध्यप्रदेश) : जिल्ह्यात एका सासऱ्याने आपल्या सुनेवर तलवारीने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही सुनेचे मनगट कापून लटकत होते. या भयानक घटनेनंतर सासरे घटनास्थळी हजर राहून ‘मी पोलिसांना घाबरत नाही’ असं बोलत राहिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सासऱ्याला अटक केली. त्याचवेळी जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला भोपाळला पाठवण्यात आले.

भोपाळमधील एका खाजगी रुग्णालयातील ५ डॉक्टरांच्या पथकाने ९ तास चाललेल्या शस्त्रक्रियेत महिलेचे दोन्ही हात पुन्हा जोडण्यात यश मिळवले आहे. महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. आरोपी सासरा कैलाश नारायण चतुर्वेदी (८० वर्षे) हे विदिशा किल्ल्यातील मंदिराचे पुजारी आहेत. काही दिवसांपूर्वी सून सीमा हिच्यासोबत सासऱ्याचा ओट्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सासरच्या मंडळींना सुरुवातीपासूनच सुनेचा त्रास होता, कारण लग्नानंतरही सीमा अभ्यास आणि नोकरी करत असे. त्यामुळे कैलास नारायण रागात असायचे आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद व्हायचे.


सून सीमा ही घरी पुजाआर्चा करत असताना मागून आलेल्या कैलास नारायण चतुर्वेदी याने तिच्या डोक्यात वार केले. सून सीमा हिने बचावात तलवार रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मनगट पूर्णपणे कापले गेले आणि लटकू लागले. त्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला लोकांचा जमाव जमला. सुनेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याचवेळी सीमा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला भोपाळला रेफर करण्यात आले. पोलिसांनी आरोपी कैलास नारायण चतुर्वेदीला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here