यावल तालुक्यात अल्पवयीन १५ वर्षाच्या मुलीवर २ अल्पवयीन मुलांकडून बलात्कार

यावल (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यात १५ वर्षाच्या मुलीवर २ अल्पवयीन मुलांकडूनच बलात्कार करण्यात आल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पत्र याबाबत यावल पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच पोलीस पथकाच्या माध्यमातून तात्काळ चौकशी करून अल्पवयीन दोन संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की बुधवार दि.२६ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन पीडित मुलगी शौचास गेली असता दोघा अल्पवयीन मुलांनी पीडित मुलीला बळजबरीने केळीच्या बागेत नेले व त्या ठिकाणी त्यानीं त्या पीडित मुलीवर बलात्कार केला तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली

या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला भादवि कलम ३५४ (अ), ३७६, ३५४, ३२३, २९४ तसेच बालकांचे लैंगिक गुन्हेपासून संरक्षण कायदा कलम ३/४/५ (ग) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सौ.सुनिता कोळपकर करीत आहेत दरम्यान अल्पवयीन दोघ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here