नाशिक (वरिष्ठ प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : रासायनिक खते, शेती अवजारे, पीव्हीसी पाईप, शेती यंत्रे यांच्या किंमती दोन अडीच वर्षात 100 टक्के वाढल्या आहेत.अर्थ संकल्पामध्ये किमती कमी करन्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एकही शब्द उच्चारला नाही, वरील शेती पूरक वस्तू खरेदी करणे शेतकऱ्यांच्या आवाक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येतील किंवा नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येईल याविषयी देखील काहीच उल्लेख नाही. उलट रासायनिक खतांवर जे अनुदान देण्यात येत होते. त्या अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रासायनिक खतांची किंमती पुन्हा वाढणार आहेत हे निश्चित. दुसऱ्या हरीत क्रांती साठी तयार राहण्यासाठी व सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन करत सेंद्रिय शेती व झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेती साठी प्रोत्साहन पर अनुदानाची तरतूद केली आहे , शेती चे उत्पन्न डबल करण्यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नाही, पंजाब,हरीयाना , राज्य स्थान बिहार , उत्तर प्रदेश या राज्यांत गहू, मका ,उस,धान या पिकाचे उत्पादकता दुप्पट झाली त्याला सेंद्रिय निविष्ठा चा वापरामुळे नाही तर आधुनिक तंत्रज्ञान व रासायनिक खते, संशोधन केलंले बियाणे , विद्राव्य खते,कीडनाशके इत्यादी वापरात आल्या मुळे शेतिच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसून येते ,शेंद्रीय शेती तुन मिळणाऱ्या अन्नधान्य हे आपल्या आरोग्यासाठी पोषक असले तरी त्यातुन मीळणाऱ्या एकुण उत्पन्नामुळे आपली १००टक्के भुक भागनार नाही
जर उत्पादन खर्चात प्रचंड प्रमाणावर वाढ होत असेल,व त्यावर शासनाकडून कसलेही नियंत्रण ठेवलं जात नसेल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे दुप्पट वाढणार ??. शेतकरी अधिकच खड्यात रुतत जाणार हे निश्चित आहे असे म्हणावे लागेल शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी, तंत्रज्ञानासाठी, संशोधनासाठी, नवनवीन प्रयोग, व्यवस्थापन, प्रोत्साहन, नियोजन, क्लस्टर उभारणी, शीतगृह उभारणी,व साठवनुक, दळणवळण, शेती साठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा, याकरिता कोणतेही प्रयत्न होता ंना दीसत नाही.
सात वर्षापूर्वी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे शासनाकडून (पंतप्रधान यांच्याकडून) आश्वासन देण्यात आले होते, यामध्ये उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. पण उत्पन्न मात्र तेच राहिले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाची गंगा ही उलट्या दिशेने चालू आहे हे मात्र खेदाने म्हणावे लागतेय







