अकोला (प्रतिनिधी) : येथील पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये चौघांना अटक केली आहे.
नुकताच सुप्रीम कोर्टानं सेक्स वर्क हे एक प्रोफेशन असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. संमतीनं जर प्रौढ व्यक्ती सेक्स वर्कचं काम करत असेल, तर अशा सेक्स वर्करना अटक करुन नये, तसंच त्यांना त्रास देऊ नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र देहविक्रीचा व्यवसाय चालवणं हे बेकायदेशीरच असेल, असेदेखील सुप्रीम कोर्टाने यावेळी स्प्ष्ट केले आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निमकर्दा या ठिकाणी एका महिलेच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. या कुंटणखान्यावर पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या पथकाने सापळा रचून छापेमारी केली. या छापेमारीमध्ये चौघांना रंथेहाथ पकड्यात पोलिसांना यश आले. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कुंटणखाना चालवला जात होता.
अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीक एक कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली. यामध्ये एक महिला घरामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील मुली बोलवून देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपींसह काही मोबाईल फोन आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनिय कलम ३, ४, ५ पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी केली जात आहे.






