पातुर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न

पातुर पोलीस

पातुर (तालुका क्राइम रिपोर्टर सुभाष हिरळकार) । दिनांक 10/12/2025 ला पातुर पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीचे भूमिपूजन पोलीस अधीक्षक माननीय अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते पार पडले.

या नवीन इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ वरळी मुंबई यांच्या अंतर्गत होत आहे काळासोबत इंग्रजांच्या जमान्याची पातुर पोलीस स्टेशनची इमारत सुद्धा अद्यावत होणे जरुरी होते शतक पूर्ण केलेली इंग्रजांच्या काळातील पोलीस स्टेशन इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी आता नवीन अद्यावत सुसज्ज अशी वास्तू निर्माण करण्यात येणार आहे नवीन इमारतीमुळे पोलीस कर्मचारी व नागरिक यांना अद्यावत सुविधा व सेवा मिळतील
भूमिपूजनाच्या वेळेस माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन ,बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड उपस्थित होते भूमिपूजनाचा कार्यक्रम पातुर पोलीस ठाणेदार हनुमंत डोपेवऻड यांच्या देखरेखित सुरळीत पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here