सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक अनुषंगाने बोदवड तालुक्यातील मनुर – नाडगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शारदाताई खडसे चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जेष्ठ नेते रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन करताना, आपण सर्व पदाधिकारी आणि रोहिणीताई खडसे या गेल्या पाच वर्षांत आणि आतासुद्धा सर्व मतदारांपर्यंत त्यांच्या सुख दुःखात धावून गेलेलो आहोत. तरी आता सर्व बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या बूथवरील सर्व मतदारांपर्यंत पोहचून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या अनुक्रमांक तीनवरील तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन करायचे आहे आणि आपल्या बूथ वरून रोहिणीताई खडसे यांना मताधिक्य देऊन शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत घ्या, असे उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे बूथ प्रमुख,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







