हिंगोणे येथील प्रभात विद्यालयात बालविवाह मुक्त भारत जागतिक दिन साजरा

बालविवाह

यावल (प्रतिनिधी अशोक तायडे) : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रभात विद्यालय, हिंगोणे येथे आज दिनांक ४ डिसेंबर  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशाने २७ नोव्हेंबर हा बाल विवाह मुक्त भारत जागतिक दिन घोषित केला आहे.

 

त्या पार्श्वभूमीवर आधार बहू उद्देशीय संस्था अंमळनेर च्या संस्थे अंतर्गर प्रभात विद्यालयात बाल विवाह मुक्त भारत प्रोजेक्ट चे यावल तालुका समन्वयक अशोक तायडे यांनी विद्यार्थ्यांना बाल विवाह कायदया संदर्भात माहिती दिली व गावात बाल विवाह होऊ देणार नाही अशी विद्याथ्यांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक एम जे गाजरे हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुजाता टी बोरोले यांनी केले तर आभार पी के पाटील यांनी मानले

याप्रसंगी एम्.जे. गाजरे, एस. एल. वाघुळदे, सुजाता टी बोरोले, पी. के. पाटील, एम. एम. सपकाळ, ए.जी. इंगळे, पी. आर. धांडे, व्ही. जी. गाजरे, डी. एम्. लोखंडे, किरण आर महाले, जे. आर विरपन, वाय. जी. कोळी, मंगला डी. बोदडे, एस. ओ. सुरवाडे, एस. एम. पाटील, ए. एचः नेमाडे, एस.ज.भोळे, एच. पी. पाटील, एम. के. फालक, इ. जे. पाटील, एल. ए. जाधव शिपाई, व्ही. आर. गाजरे शिपाई आदींसह विद्यार्थी – विद्यार्थिंनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here