जळगाव (संपादक सुनिल पाटील) : ॲग्रोकेअर कृषीमंच, नाशिक, महाराष्ट्र शासन – कृषि विभाग व गेन्स अॅकेडमी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर “जागतिक मृदा दिन” निमित्ताने अॅग्री स्टार्ट-अप कन्वेंशन – २०२४ कृषि उद्योजकता निर्मिती मोफत कार्यशाळा कृषि उद्योजकता निर्मिती व शेतकरी उत्पादक कंपनी प्रशिक्षण घेण्यात आले.
कार्यक्रमाला विभागीय कृषि सहसंचालक, कृषि विभाग, नाशिक सुभाष काटकर, प्रकल्प संचालक, आत्मा, नाशिक अभिमन्यु काशिद, कृषि उप संचालक, कृषि विभाग, नाशिक जगदिश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्रातील कृषि उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यां, कृषि सेवा केंद्र यांची मूल्य साखळी विकासासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होणे, नवीन व्यवसाय सोबत जोडणी, विविध कृषि व्यवसायातील संधी माहिती होण्यासाठी, त्यांच्या कंपन्यांची क्षमता विकास होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण १ दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये कृषि क्षेत्रातील विविध संधी, शेतकरी उत्पादक कंपनी स्थपणा व व्यवस्थापन, नोंदणी झालेल्या कंपन्यांना व्यवसाय जोड़नी, ग्रामीण व शहरी भागेत करता येणारे व्यवसाय ओळख, प्रोजेक्ट रिपोर्ट – बँक लोन माहिती, विविध टेक्नोलॉजी माहिती, शेतमाल निर्जलीकरण व्यवसाय संधी, कांदासाठी पूरक व्यवसाय कसा कराल ? कंपण्याना कर्ज पुरवठा, मार्केट जोडणी, कृषि विषयक शासकीय योजना अनुदान, आदि महत्वपूर्ण विषयाचे १ दिवसाचे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.







