महर्षी वाल्मिक ऋषीं यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन

महर्षी वाल्मिक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आज दिनांक २६/१०/२०२६ सोमवार रोजी आघकवी महर्षी वाल्मिक ऋषीं यांच्या प्रतिमेला  माल्याअर्पण महानगर जिल्हा अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक महानगर जिल्हाअध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

 

आज आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषीं यांनी रामायणा सारख्या महान ग्रंथाचे सर्जन करून समाजाला सत्य,धर्म आणि मानवतेचा संदेश देत महर्षी वाल्मिक ऋषीं यांनी समाजात समानता, नैतिकता आणि आदर्श जीवन मूल्यांचा संदेश रुजवला. त्यांच्या लेखणीतून घडलेले रामायण हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून मानवतेचा,कर्तव्याचा आणि आदर्श जीवनाचा मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत आपणही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ज्ञान, न्याय आणि समतेचा प्रकाश पोहोचवू या. असे मनोगत जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी केले. आभार महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी यांनी मानले

यावेळी जिल्हा समन्वयक विकासदादा पवार , महानगर जिल्हा कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे , जिल्हा उपपाघ्यक्ष किरणभाऊ राजपूत , चेत्रसेनभाऊ पाटील , फराहन शेख , सतिश चौव्हाण इतर पदाधिकारी उपस्थित होते

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here