यावल (प्रतिनिधी अशोक तायडे) : बुलंद पोलीस टाईम्स जळगाव जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे दिनांक ६ डिसेंबरला शुक्रवारी महामानव परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त बामनोद तालुका यावल डॉक्टर बाबासाहेब बौद्ध विहार मध्ये डॉ बाबासाहेब यांना त्रिवार अभिवादन करून त्रिशारण पंचशील घेऊन ग्रामपंचायत पर्यन्त कॅन्डल मार्च रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
काही मान्यवर यांनी डॉ बाबासाहेब यांच्या जीवनातील त्यांनी सर्व समाजासाठी काय केले त्यासाठी त्यांना खूप अपमान पण सहन करून संविधान लिहले व त्यांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर सर्व जाती धर्मा साठी कायदा लिहून सौरक्षण साठी बळकट बनवून गेले जग संपेल पण डॉक्टर बाबासाहेब यांनी दिलेले संविधान व बुद्ध आणि धम्म हे ग्रन्थ संपणार नाही व त्याचे आपण सर्व धर्मीय लोक संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे असे बऱ्याच मान्यवरणी माहिती दिली
तरी महापरीनिर्वाण च्या कार्यक्रम प्रसंगी पुढील मान्यवर उपस्थित होते बौद्ध उपासक भूषण केदारे भीमराव केदारे उमेश केदारे अश्वदीप भालेराव तुषार भालेराव अविनाश तायडे नितीन भालेराव प्रल्हाद मेंबर किरण केदारे शांताराम केदारे दिलीप भालेराव, उपासिका: ग्रा.सदस्य छाया केदारे शुभांगी केदारे सुषमा केदारे अर्चना तायडे व इत्यादी तसेच फैजपूर येथील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेऊन सहकार्य केलं.







