सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : अरबीया महिला बहुउद्देशीय मंडळातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान समाजसेवकांसाठी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सावदा येथे करण्यात आले होते. त्यात विविध मान्यवरांना हा पुरस्कार मंडळाकडून प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्माकर महाजन जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष रावेर हे होते. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन राजेशभाऊ गजानन वानखेडे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य, राजेंद्रभाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष सावदा, सय्यद अजगर सय्यद तुकडु कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ,फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुर्बान करिम, जालनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल मुकिम देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजयभाऊ शिरीष चौधरी एन एस यु आएचे राज्य सरचिटणीस तथा धनाजी नाना प्रतिष्ठानचे सचिव व सावदा पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप पाटील, रावेर तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार संजयजी तायडे, रावेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र फेगडे, डीएड कॉलेजचे प्राचार्य सलीम खान, श्रीरामपूरचे माजी मुख्याध्यापक सय्यद असगर अली, सावदाचे नगरसेवक पठाण फिरोज खान, फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान करीम, डायमंड फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. हारून सेठ, मालेगावचे एल एम व्ही हायस्कूलचे मुख्याध्यापक राशीद अख्तर अल्वी, मौलाना आझादचे प्रिन्सिपल शेख जाकीर, पत्रकार शामभाऊ पाटील, पत्रकार युसुफ शाह सलाहुद्दीन अदीब, पत्रकार फारुख शेख, पत्रकार लाला कोष्टी, पत्रकार शकील भाई, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष इलाहाजूद्दीन फारुकी, पोलीस बॉईजचे जिल्हा सचिव भूषण नगरे, बजाज शोरूमचे प्रोप्रा. हेमंत तावडे, सुपर बॅटरीचे प्रोप्रा. इम्रान खान, हाजी अमानुल्ला खान, राहुल पाटील, जामनेर ज्येष्ठ नागरिक अलहाज हुस्नोद्दिन शेख, पत्रकार शेख फरीद नुरा, लहान वाघोदाचे लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वप्निशा पाटील, डॉक्टर अन्सार, जेष्ठ पत्रकार दीपक नगरे, मंडळाचे सल्लागार शेख कमाल, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श परिचारिका कल्पना नगरे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक हाजी जिस्मे अली असलम खान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट मंडळाच्या अध्यक्षा गजाला तबस्सुम यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी गरजू बचत गटांना शिलाई मशीन व पापड बनवण्याचे यंत्र मंडळाकडून वितरित करण्यात आले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. राज्यभरातील ४० शिक्षकांना तसेच २० विविध क्षेत्रातील समाजसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात जुनेद खान मोहसीन, मोईन सर, तौशिफ सर, समीर शेख यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद शाकीर जनाब व कमाल सर यांनी केले असून आभार प्रदर्शन शेख जियाउद्दीन व मोहमद कासिफ यांनी व्यक्त केले.







