यावल (प्रतिनिधी अशोक तायडे) : आज (दि.१२) रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जी यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिवस चे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्ताने आज तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी उत्कृष्ट काम करणारे पत्रकार यांना सन्मानपत्र देऊन गौरविले.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो पत्रकारांमुळे आम्हाला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सर्व गोष्टी ग्रामीण भागातील बातम्या संदर्भात माहिती मिळते पत्रकार हा एक रक्तवाहिनी सारखं काम करत असतो तसेच शेतीच्या संदर्भामध्ये माहिती मार्गदर्शन केले रस्त्या संदर्भामध्ये अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सतत कटिबद्ध आहोत असे तहसीलदार यांनी सांगितले आपत्ती काळामध्ये झालेल्या नुकसान भरपाई चे काम जलद गतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तशी मदत मिळवून देतो त्यांना त्यांचा वैयक्तिक जीवनामध्ये आलेला अनुभव हा सांगितला.
त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार यांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रमोद वाणी दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी शेखर पटेल तसेच सुधीर चौधरी सर श्री तायडे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार क्राईम वार्ता चे तालुका प्रतिनिधी सुधाकर धनगर बुलंद पोलीस टाईम जळगाव जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे हिंगोना येथील पत्रकार रंजीत भालेराव चुंचाळा येथील विकी वानखेडे जीवन चौधरी साईमत चे तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील देशदूत तालुका प्रतिनिधी अरुण पाटील योगेश सोनवणे अमित तडवी फैजपूर असे अनेक तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते नायब तहसीलदार श्री विनंते साहेब श्री जाधव साहेब उपस्थित होते.







