एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय च्या वतीने “ गोसासी राजगुरुनगर “ येथे मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर

यावल (प्रतिनिधी अशोक तायडे) : एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी पुणे आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व खेड राजगुरूनगर तालुका विधी सेवा समिती तसेच राजगुरूनगर बार असोसिएशन खेड, पुणे आणि स्व. प्रा. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय, गोसासी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एक दिवसीय मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर शनिवार दि. 25 जानेवारी 2025.गोसासी, ता.राजगुरुनगर खेड, जि. पुणे येथे पार पडले.

 

उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. ए.एस. सय्यद साहेब अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजगुरुनगर पुणे, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विशाल शिंदे साहेब गट विकास अधिकारी, कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर न्यायाधीश मा. श्री. एस. पी.पोळ, मा. श्री. पी. एस. इंगळे, मा. श्री. ए. एम. हुसेन, मा. श्रीमती. सरिता विश्वभरण, मा. श्रीमती. एस. बी.नाईकणवरे (गरड ), मा. श्रीमती. जे. व्ही. मस्के, अ‍ॅड.रोहिदास टाळकर अध्यक्ष राजगुरुनगर बार असोसिएशन, अ‍ॅड.सतीश गोरडे अध्यक्ष स्व. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय गोसासी, सरपंच संतोष गोरडे, ग्रामसेवक अजित पलांडे, तंटामुक्त अध्यक्ष मारुती गोरडे, डॉ.रोहिणी जगताप प्राचार्य. एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय , उप. प्रा. कैलास पोळ आणि श्री. स्वप्नील जाधव विधी कक्ष साहाय्यक अधिकारी एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालय , श्रीमती. प्रिया तोतले, श्रीमती. अर्पिता गोस्वामी, श्रीमती. सुनीता तपासे, श्री. गजानन वडूरकर उपस्थित होते.

अनुच्छेद 14 नुसार कायद्या समोर सर्व सामान असल्याचे म्हटले आहे. मात्र अन्याय झाल्यानंतर न्याय प्राप्त करण्याची सामान संधी उपलब्ध करून दिल्या शिवाय न्याया समोर सर्व सामान आहे अशे म्हणता येणार नाही. म्हणून मोफत कायदे विषयक शिबिर आवश्यक आहे.
– डॉ. रोहिणी जगताप
(प्राचार्य एस. एन. बी.पी. विधी महाविद्यालय )

या शिबिरात महिला सक्षमीकरण आणि कायदेशीर हक्क, बालकाचे हक्क आणि बालसंरक्ष कायदे, सायबर गुन्हे आणि त्यावरील उपाय, जमिनीचे हक्क आणि जमिनीवरील वाद, अपघात आणि नुकसान भरपायी साठी कायदेशीर प्रकिया, मोफत विधी सहाय्य या बाबत मार्गदर्शन व श्री. स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घरेलू अत्याचार यावर आधारित पथनाटिका देखील सादर केली.गोविंद गोरडे, आप्पासाहेब गोरडे, लक्ष्मण गोरडे, बाळासाहेब गोरडे, माऊली गोरडे, नवनाथ घोलप, अश्विनी गोरडे, संतोष अरुडे, उत्तम गोरडे, सुधाकर गोरडे व सर्व ग्रामवासियांचा देखील शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here