व्हाईस ऑफ मीडियाची रावेर तालुकास्तरीय कार्यकारणीची बैठक संपन्न

व्हाईस ऑफ मीडिया

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथे आज दि.२९/०१/२०२५ विश्रामगृहावर व्हाईस ऑफ मीडियाची रावेर तालुका स्तरीय कार्यकारणीची बैठक सावदा येथे पार पडली मीटिंगमध्ये नवीन सभासद नोंदणी करण्यात आली. दिलीप वैद्य सर आणि मिलिंद टोके सर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी चालवलेल्या लढा नेटाने पुढे न्यावा असे सुतोवाच ज्येष्ठ पत्रकार श्री वैद्य सर यांनी केले. मीटिंगमध्ये सर्व सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.

व्हॉइस मीडिया या पत्रकार संघटनेकडून पत्रकारांच्या हितासाठी मुख्य भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही कार्याध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली. मीटिंगमध्ये सूत्रसंचालन पंकज पाटील यांना केले. याप्रमाणे तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष – अनोमदर्शी तायडे, कार्याध्यक्ष -प्रवीण पाटील, उपाध्यक्ष – विजय अवसरमल, सचिव – गणेश रामा भोई, सहसचिव – युसूफ खाटीक, कोषाध्यक्ष -मुबारक तडवी, सदस्य-अनिल मानकरे, रवींद्र हिवरकर, साजिद शेख, राजेंद्र दिपके, भारत हिवरे, संजय चौधरी,मसुदखान सईदुल्ला खान, सुनील चौधरी,अजहर खान, शेख इंद्रिस शेख इस्माईल, आनंदा रामा भालेराव, सुरेश पवार आदी,तथा जेष्ठ पत्रकार राजेंद्र भारंबे, पंकज पाटील,राजेश चौधरी, प्रदीप कुलकर्णी, राजेश पाटील आणि तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here