सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथे आज (दि.२८) रजानगर व ताजुशया नगर भागातील राहिवाशांनी नवीन गटारी बांधणे व साफसफाईची मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिका-यांकडे केली आहे. रजानगर, ताजुशरीया नगर भागात घरासमोर गटारी बांधण्यात आल्या आहेत परंतु त्यातील सांडपाणी त्या गटारीतून पुढे जाण्यास मार्ग नाही त्यामुळे परिसरात सांडपाणी बाहेर वहात असते. त्यामुळे या गटारींचे काम सुरु करून योग्य तो मार्ग काढावा यासाठी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
मस्कावद रोडवर साचलेल्या गटारीतील सांडपाण्याच्या समस्येने नागरिक अनेक दिवसांपासून अडचणींना तोंड देत आहेत. गटारीच्या पाण्याच्या दुर्गंधीचीही मोठी समस्या होती. नागरिकांची गैरसोय होत असल्याने, राहिवाश्यांनी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना श्वासन देताना ते म्हणाले की नक्कीच नवीन गटाराचे काम लवकरात लवकर सुरू होईल.
मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना निवेदन देताना सय्यद अकील, शेख अय्युब, निसार बागवान, साबीर शेख मंजूर,अमजद मेकॅनिकल, सुभान तडवी, मो. इब्राहिम मो. साबीर, शेख तोफिक, शेख सुलतान यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.







