धाराशिवमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; ७ जखमी

फटाका कारखान्यात भीषण स्फोट

धाराशिव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये ७ जण जखमी झाल्याचे समजत आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

तेरखेडा या ठिकाणी २०० च्या जवळपास फटाके कारखाने आहेत. यातील एका कारखान्याच्या बाजूला काही शेतकऱ्यांनी बांध पेटवला होता. बांध पेटलेली ठिणगी फटका कारखान्यात जाऊन पडली असल्याची अफवा पसरली. त्यानंतर काही वेळात एक मोठा स्फोट झाला आणि आग लागली. या आगीमध्ये कारखान्यात काम करणारे ७ जण जखमी झाले.

 

या कारखान्यात फटाके बनवण्याचे काम सुरू होते, त्याच वेळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. यानंतर तातडीने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here