ट्रकमधील सेंट्रिंग प्लेट अंगावर पडल्याने ४ मजुरांचा मृत्यू

accident
file photo

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : ट्रकमधील सेंट्रिंग प्लेट अंगावर पडल्याने ४ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर-मालेगाव महामार्गावर घडली. दिवाण मानसिंग गरासिया, विजय कंवरलाल गरासिया, निर्मल राजूजी गरासिया आणि विक्रम मदनजी कछावा अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खाट विकणारे पाच परप्रांतीय मजूर हे सोमवारी कर्नाटक येथून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लोखंडी प्लेट नेणा-या ट्रकने जात होते. सर्व मजूर ट्रकमध्ये गाढ झोपले होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील ढाब्याजवळ चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटचा ढीग मजुरांच्या अंगावर पडला. गाढ झोपेमध्ये असताना ही घटना घडली.

अंगावर लोखंडी प्लेट पडल्यामुळे मजुरांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मजूर मध्य प्रदेशच्या निमच जिल्ह्यातील खडावदा येथे राहणारे होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे मजूर कर्नाटकात गेले होते. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघेही खाट विणण्याचा व्यवसाय करत होते. या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here