सावदा येथे संत नरहरी सोनार यांची ७३१ वी पुण्यतिथी सोहळा संपन्न

संत नरहरी सोनार

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथे समस्त सावदा वासीय सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी सोनार यांची ७३१ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन तथा प्रतिमापूजन सोहळा मोठ्या भक्तीभावाने जाफर लान्स येथे साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे अध्यक्ष संजय भामरे, सुवर्णकार समाज अध्यक्ष मुक्ताईनगरचे प्रवीण शूरपाटणे, वधु वर मेळावा प्रमुख जळगावचे संजय विस्पुते, जळगावचे उद्योजक विजय वानखेडे, जळगाव येथील व्यापारी नंदकिशोर बागुल, मुक्ताईनगर चे शिवा उज्जैनकर, ईश्वर बिरारी, ज्ञानेश्वर सोनार, जळगावचे अनिल दापोरेकर, रावेरचे सोपान अहिरराव तसेच सावदा नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ताराबाई वानखेडे, माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व अतिथींचे सावदा सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी सोनार यांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सावदा परिसरातील सुवर्णकार समाजबांधव उपस्थित होते. सावदा शहरात चंद्रकांत विस्पुते यांनी काही वर्षापासून संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी साजरी करण्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. ते त्यांच्या घरीच छोटे खानी पुण्यतिथी साजरी करीत असत त्यांचीच प्रेरणा घेऊन सर्व समाज बांधवांनी यावर्षीपासून संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीचे स्वरूप मोठे करण्याचे ठरविले. यासाठी चंद्रकांत विसपुते यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

प्रसंगी यशवंत बागुल यांनी संत नरहरी सोनार यांची जीवनगाथा थोडक्यात विशद केली. संजय विस्पुते यांनी संतांची पुण्यतिथी साजरी करत असताना समाज एकत्रीकरण कसे करता येईल, तसेच समाजात एकोपा कसा राहील याचा प्रयत्न सुद्धा सर्वांनी करायला हवा असे प्रतिपादन केले. याप्रसंगी राजेश वानखेडे यांनी आपल्या मनोगतात अल्पावधीतच स्थानिक आमदारांच्या मदतीने महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी केलेले योगदान पाहता मुक्ताईनगर येथे नरहरी महाराजांचे भव्य असे मंदिर बांधून लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा करून मुक्ताईनगर सुवर्णकार समाज अध्यक्ष प्रवीण शुरपणखे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर वानखेडे यांनी तर आभार राजेश वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावद्यातील सर्व सुवर्णकार बांधवांनी अमूल्य असे सहकार्य केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here