नागरिकांना डायल ११२ प्रमाणेच क्युआर कोड द्वारे ही तक्रार दाखल करता येईल – सपोनि विशाल पाटील

डायल ११२

सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गतही सदर उपक्रम राबविले जाणार आहे. नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी ११२ नंबर डायल वर संबंधितांना तक्रार करता येत होती.

 

त्याच प्रमाणे आता पोलीस प्रशासनाने क्युआर कोड आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून संबंधितांना आपली तक्रार दाखल करता येईल ही तक्रार जिल्हा पोलीस प्रशासनाला प्राप्त होऊन ती संबंधित पोलीस स्टेशन ला पाठविण्यात येणार असून तक्रारी ची तातडीने दखल जसे ११२ नंबर लावल्या वर पोलीस कर्मचारी तात्काळ दखल होऊन तक्रारदाराची दखल घेतात व समस्या जाणून घेत निसरन करीत तक्रारदाराला समाधान मिळते त्याच धर्तीवर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गतही सदर संकल्पना राबविण्यात येणार आहे

 

जळगांव जिल्हा पोलीस प्रशासनाने हे क्युआर कोड शासकीय निमशासकीय कार्यालये येथे सर्व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली असल्याचे एका कार्यक्रमाप्रसंगी सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here