अकोला (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय वाट) : बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महान गावात पोलीस चौकी पासून अगदी हाकेच्या अंतरावर व मुख्य रस्त्यांनवर चार ते पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वरली मठका,जुगार, टेबल व ऑनलाईन वरली चक्रीचा अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या नजरे समोरच अवैध धंद्यांचा काळा बाजार तेजीत सुरू असून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे . यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बेकायदा सुरू असलेल्या अवैध धंद्यांन मध्ये लाखोंची हार जित होतांना दिसुन येत आहे, महान गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालय, ग्राम पंचायत व पोलीस चौकीच्या परिसरात सुरू असलेल्या वरली, जुगार , मटका, व टेबल सारख्या अवैध धंदेयान मुळे, शाळेकरी विद्यार्थी, महिला प्रवासी, व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरली जुगार व ताश पत्यांचेअड्डे मोठ्या उत्साहात व जोमाने सुरू असल्याने सण उत्सवाच्या काळात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून पिजंर पोलीसांच्या कार्य तत्परतेवर प्रश्न चिन्ह लागले आहे. गावात वरली मटका जुगार व टेबल चालविणाऱ्या व्यवसायीकांची संख्या मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याने अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत,
अवैध धंदे सुरू असल्या बाबत पिंजर पोलीस स्टेशन चे ठणेदार यांना प्रतिक्रिया मागीतली असता अवैध धंद्यांन वर कारवाही झाली असल्याचे सांगण्यात आले मात्र स्थानिक सुत्राकडून माहिती घेतली असता दुपारी १२ वाजता एक दोन व्यक्ती ला नाममात्र केस करण्याकरीता करीता ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक सुत्रा कडून प्राप्त झाली, अवैध धंदे व्यवसायीकांना आधीच सुचना मिळाल्याने त्यांनी एक तास चुप्या मार्गानी व्यवसाय केला , दुपारी १ वाजता दरम्यान एलसीबीचे पथक महान येथे परस्पर निघुन गेल्याने पोलीस प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे, स्थानिक पोलीसांची मुक समंती व एलसीबीचा हात पाठीशी असल्याने अवैध धंदे व्यवसायीकांच्या हिम्मती वाढल्या असल्याने महान येथे आज ही वरली जुगार मटका , टेबल, तितली बोर्ड, ऑन लाईन वरली चक्री नव्या उत्साहात व जोमाने सुरू आहे. अवैध धंद्यांचा बाजार अजूनही जैसे थे आहे. या सर्व प्रकारा मुळे संबंधीत विभागाचे लक्तरे वेशीला टांगल्या गेले असल्याचे दिसून येते
वरली जुगारा मुळे अनेक तरून व शाळेकरी विद्यार्थी व्यासनाधीन होत आहेत मात्र स्थानिक पोलीस प्रशासन हतबल असल्याचे दिसून येते गावात एक दोन ठिकाणी नाही तर चक्क पंधर ते विस लोक स्वतंत्रपणे मटका जुगार चालवत असल्याने या परिसरात वरली जुगार माफियांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्या पैकी काही वरली बहाद्दर हॉटेल व छोट्या गल्लीत वरली च्या चिट्या लिहतांना दिसून येतात, या मध्ये लाखो रुपायांची उधळपट्टी होते. मात्र मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या अवैध धंदेयान कडे पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी बिट जमादार , यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होतांना दिसुन येते, चोरटया मार्गाने चालणारा वरली चा धंदा आता शहरातील मुख्य चौकात व रस्त्यांनवर खुलेआम पाहायला मिळत आहे. या मुळे शेतकरी शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत वरली जुगाराचा खेळ मोठी भर घालत असल्याचे चित्र महान येथे दिसून येत आहे . मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा वरलीत हारजीत होत असल्याने काही कर्ज बाजारी शेतकरी आत्महत्या कडे वळत आहेत, तर काहीचे सुखी संसार उदवस्थ होतांना दिसत आहे. मात्र या कडे पोलीस प्रशासन, गुन्हे अन्वेशन विभागाची यंत्रणा बघ्याची भुमिका घेत असल्याने पोलिसांची नाकर्ते पणाची भुमिका संशयास्पद असून कायदा व शांतता सुव्यवस्थेचा बट्टयाबोळ होतांना दिसत आहे. या मुळे अवैध धंदेयांन कडे पोलिसांचे जानिव पुर्वक अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे . जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या गंभीर प्रकारच्या बाबी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे,







