अकोला येथे अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय तरुणाचा अत्याचार

लैंगिक अत्याचार

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : अकोला येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडलीय. रात्री २ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर अत्याचार झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय. अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्याचा शोध पोलिसांकडू घेतला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिची मैत्रिण रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. त्यावेळी एका तरुणाने तिला दुचाकीवरून अकोट फैल भागात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर परत पीडितेला रेल्वे स्टेशन चौकात सोडलं. दरम्यान या घटनेवरून महिले सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पीडित अल्पवयीन मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here