हैद्राबाद (वृत्तसंस्था) : सध्या आयपीएलचा हंगाम जोरदार सुरु आहे. सनराईजर्स हैदराबादचा संघ हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास आहे. दरम्यान, येथील हॉटेलमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
हैदराबादमधील हॉटेल पार्क हयातमध्ये रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत एक संपूर्ण मजल्याला व्यापले होते. या आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये आयपीएलचा SRH संघ मुक्कामी होता. त्यामुळे, सर्वांनी धावाधाव करत या खेळाडूंना सुखरुप बाहेर काढले आहे. सध्या, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तर, सनराईजर्स हैदराबाद संघाचे सर्व खेळाडू सुरक्षित असल्याची माहितीही ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
https://twitter.com/Orangearmyforvr/status/1911699096131477582
दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे, फायर ब्रिगेडच्या जवानांनी कुठलीही नुकसान न होता हॉटेलमधून एसआरएच संघाला आणि रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने या आगीत कुठलीही मोठी हानी झाली नसल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.