सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी या शासन नोंदणीकृत संस्थेने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित संत तुकाराम विद्यालय,पानगाव या विद्यालयास मा. श्री एन.एन जगदाळेसाहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैराग) मा. श्री पिंटू नाईकवाडी (सामाजिक कार्यकर्ते , पानगाव) यांच्या शुभहस्ते महापुरुषांचे विचार, शैक्षणिक व सामाजिक कार्य याची माहिती असणारी एकूण 68 पुस्तके प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप पाटील सर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांना भेट दिली. सदर कार्यक्रमा प्रसंगी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती प्रा. डॉ.चंद्रकांत उलभगत यांनी दिली.
सदर कार्यक्रमात संस्थेचे सचिव श्री विजय दिवाणजी यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. जगदाळे साहेब यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेच्या गेल्या पाच वर्षातील विविध उपक्रमाच्या यशस्वी कार्यवाहीबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. व या संस्थेच्या विविध उपक्रमा प्रसंगी उपस्थित राहता आले याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर संत तुकाराम विद्यालय, पानगाव ही एक गुणवत्तापूर्ण शाळा असून या ठिकाणी दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे हे सांगितले. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी महापुरुषांनी केलेल्या कार्याची माहिती करून घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल वाणी सर सहसचिव श्री नागनाथ सोनवणे सर व खजिनदार श्री माणकोजी ताकभाते या पदाधिकाऱ्या बरोबरच सौ.ंसायरा मुल्ला, श्रीमती सुजाता अंधारे, रेखा विधाते, रेखा सुरवदे, आशाताई स्वामी, अनुसया आगलावे व सुनीता गायकवाड या महिला आणि श्री अजय तिवारी, प्रा. डॉ. चंद्रकांत उलभगत, श्री सुरेंद्र जंगम, प्रा. रतिकांत हामणे, श्री सागर घंटे, श्री सुनील फल्ले श्री सचिन मस्के, श्री सुनील नवले, श्री गणेश सातारकर, श्री बी.बी गायकवाड हे पुरुष सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमात संस्थेच्या वतीने वैराग येथील श्री परशुराम सूर्यवंशी यांना त्यांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शिधा भेट देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाले सर यांनी केले सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.