सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भाऊ समिरे आणि सावदा-रावेर शहर महिला अध्यक्ष वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा शिंदे गटाच्या महिला अध्यक्ष नंदाताई निकम, माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, आदर्श दिव्यांग संस्थेचे सचिव कामील शेख रऊफ आणि मकसूद खान उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले आपले विचार मांडले गोरगरिबांचा याचा लाभ झाला पाहिजे. तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीच्या कौतुक्या साधून मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सहकार्याने हे कॅम्प आयोजित केला.
या आरोग्य शिबिरात गावातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. दिनेश भाऊ समिरे यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.” वैशालीताई पाटील यांनीही समाजसेवेच्या या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या शिबिराने सावदा परिसरात सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जागृतीचा संदेश पसरवला असून, यापुढेही असे उपक्रम आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे.