सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे दि. 16 एप्रिल 2025: सावदा पोलीस स्टेशनने अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करत 2024 आणि 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. स्वाभिमानी पत्रकार संघ, महाराष्ट्रचे सचिव रमाकांत तायडे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर 15 एप्रिल 2025 पासून उपोषण सुरू केले होते. यासंदर्भात सावदा पोलीस स्टेशनने आपल्या कारवाईचा अहवाल सादर केला आहे.
2024 मधील कारवाई:
– अवैध दारू विक्री करणाऱ्या 90 इसमांवर गुन्हे दाखल.
– 24,35,180 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट.
– अवैध जुगार चालवणाऱ्यांवर 24 गुन्हे दाखल, 2,79,293 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
2025 मधील कारवाई:
– अवैध दारू विक्री करणाऱ्या 25 इसमांवर गुन्हे दाखल.
– 10,48,073 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट.
– अवैध जुगारावर 11 गुन्हे दाखल, 14,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
सावदा पोलीस स्टेशनने पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस प्रशासनाने श्री.रमाकांत तायडे यांना उपोषण थांबवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही कारवाई स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक ठरली असून, सावदा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.