७४ व्या स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण तसेच ऑनलाइन वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वसार केंद्र भाल, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे कोविड – १९ प्राप्त परिस्थितीनुसार ७४ व्या स्वातंत्र्यदिन ऑनलाइन वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच गंदगी मुक्त भारत अभियाना अंतर्गत साफसफाई, वृक्षारोपण सहा फूट उंचीचे शेवग्याची रोपे लावून. पुढील सहा महिन्यात त्याची फळे शालेय पोषण आहारात नक्कीच येथील मुलांना मिळतील. अशा रोपांची लागवड करण्यात आली. मोहिनी बागुल यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ ही शेवग्याची झाडे शाळेत आणून लावण्यात आली.
विशेष कौतुक वसार गावाचे करावे लागेल. वसार गावातील ग्रामस्थांनी १७ मार्च पासून शाळा लॉकडाऊन आहे. पण तरीही शालेय परिसर सुव्यवस्थित त्यांनी ठेवला आहे. तसेच बागेला अजून कोणीही हातही लावला नाही. गेल्यावर्षी राबविलेल्या म्हणजेच शाळेसमोर कोणीही कचरा आणून टाकू नये. गाव शाळेत आणि शाळा गावात असे स्वच्छता अभियान राबविलेले अजून अबाधित आहे. भारत गंदगी मुक्त अभियान खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं वाटल.
पहिली ते आठवीच्या सर्वच मुलांनी ऑनलाइन वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवून बक्षिसे मिळविली आहेत. बक्षीस त्यांना शाळा सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप फुलोरे यांच्या हस्ते देण्यात येतील. विशेष म्हणजे महिला बचत गटांना ही एका महिला गृहउद्योग यांनी काम देण्याची तयारी दर्शविली. आमच्या महिलांना एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे जाता येईल. असे मत मोहिनी बागुल यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here