पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) – पंढरपूर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे झाडे झुडपे, हेच आपले पाहूणे, पावसाळा सुरू झाला की सर्वत्र झाडे लावण्याचा उपक्रम सुरू होतो. आज दिनांक दि.५ जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वृक्ष लागवडीसाठी दिलेले एकूण २५० वेगवेगळ्या जातीची रोपे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पोलीस अंमलदार स्वेरी कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या वतीने ६५ एकर च्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या बाजूला बांधावरती जेसीबीच्या साह्याने खड्डे घेऊन एकूण २५० रोपे वृक्षारोपण करण्यात आली.
यावेळी तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी मानवी जीवनात तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावणे, किती गरजेचे व महत्वाचे आहे याची माहिती दिली. ते म्हणाले, मानवी जीवनात पाणी जेवढे आवश्यक आहे तेवढेच झाडे सुद्धा आहेत, झाडांमुळे फळे,फुले, अन्नधान्य, पक्ष्यांना निवारा, मानवांना सावली, असे अनेक फायदे आहेत, झाडांची मुळे पाणी शोषून आणतात, झाडांमुळे कोणत्या जमिनीत पाणी आहे याची माहिती मिळू शकते, असे सांगितले.







