बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या‘ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुख्यमंत्र्यांचे उत्तर

धरणगाव (उपसंपादक प्रा. पी एम पाटील) : क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धरणगाव येथे केले. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवून टाकू या वक्त्यव्यावर मुख्यमंत्र्यांना छेडले असता, ते म्हणाले की, बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही.

कम ऑन किल. मी हिंमत असेल तर अंगावर या, पण अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभ चित्रपटात जशी अ‍ॅम्बुलन्स घेऊन येतो तशी अ‍ॅम्बुलन्स घेऊनच या. कारण तुम्ही पायावर चालत जाणार नाही, तर जाताना आडवे होऊन स्ट्रेचरवर जाल, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात आव्हान दिले होते. उध्दव ठाकरे यांच्या या टिकेला शुक्रवारी धरणगावात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलबच्चन भैरवी अशी उपाधी दिली. अशांना मी उत्तरही देत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here