सलमान खानने अनेकांचं केलं वाटोळं

मुंबई – सिनेइंडस्ट्रीत आपल्यावर कोणाचाही वरदहस्त नसल्याचं जाणत असणाऱ्या सुशांतला या झगमगणाऱ्या दुनियेतून आपल्याला दूर फेकूनही दिलं जाऊ शकतं अशी धास्ती एकेकाळी सतावत होती. त्याचं ट्विट पाहता हे लक्षात येतं. निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या नेपोटीझम हा मुद्दा चर्चेत आला आहे. नुकतेच कंगणा राणौतने देखील पुन्हा एकदा नेपोटिझ मुद्दा समोर आणला आहे. मुळात ती नेहमीच याबाबत बोलत आली आहे.अनेकदा यावरून वादही झाले आहे. ‘छिछोरे’ नंतर सुशांतकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा एक-एक करून त्याच्या हातून निसटले. त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमचा शिकार झाल्याचं बोललं जात आहे. कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कंगणा पाठोपाठ बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी याच मुद्द्यावरवरून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
अभिनव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती. अभिनवनं त्याच्या पोस्टमध्ये जे लोक आपली मनमानी करून कलाकारांनी असं वर्तन करतात. त्यांचा पर्दाफाश करणं गरजेच आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान असं म्हणत सलमानवर थेट आरोप केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here