रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात भास्कर जाधव यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही,” अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव यांच्या विधानानंतर आता राज्यातील वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. गुहागर भाजपचे नेते डॉ. विनय नातू यांनी भास्कर जाधवांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेले्या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण संघाचे गुहागर तालुकाध्यक्ष धनशाम जोशी यांना बेडकाची उपमा देत चांगलीच आगपाखड केली. मला पराभूत कऱण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकावलं. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला, त्यातही माझे नाव घेण्यात आले. ठाण्यातील त्या नेत्यालाही मी सोडणार नाही. घनशाम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहायला पाहिजे होतं. पण त्यांनी समाज म्हणून पत्र लिहीलं याचं वाईट वाटलं.







