कोरोना संसर्गापासून सौभाग्याचे रक्षण व्हावं यासाठी हरतालिकेचा उपवास

पूजेच्या साहित्यासोबत सॅनिटायझरलाही महत्त्वाचे स्थान

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील)- जिल्ह्यातील शहादा येथील महिलांनी यावर्षीचा हरतालिकेचा उपवास कोरोना संसर्गापासून आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे यासाठी करण्यात आला असल्याचे सांगितले.
मागील चार महिन्यापासून कोरोना संसर्गाने जगात थैमान घातले असून आपले सौभाग्य या संकटाच्या काळात वाचविण्यासाठी मनोभावे पूजाअर्चा करून हरतालिकेचे व्रत केले आहे.दरवर्षी महादेवाच्या मंदिरात जाऊन हरतालिकेची पूजा पूर्ण केली जाते .परंतु या वर्षी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून घरच्याघरी पूजन करून हरतालिकेचे व्रत पूर्ण केले.यावर्षी पूजेच्या साहित्यात हळद-कुंकू सोबतच सॅनिटायझरची देखील वर्णी लागली होती.हे व्रत सुवासिनी आपल्या पतीचे आयुष्य वाढावे व ते दीर्घायुषी व्हावे यासाठी करतात. तर कुमारिका आपल्याला इच्छीत जीवनसाथी मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. हिंदू धर्मात अशा व्रत वैकल्यांना खूप महत्त्वाचे स्थान असून संकटाच्या काळात एक अलौकिक ऊर्जेचे स्रोत निर्माण करण्याची शक्ति यामध्ये आहे म्हटले जाते.म्हणूनच की काय या वर्षी सौभाग्यवतींनी करोना पासून मुक्तीसाठी व करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी महादेवाकडे साकडे घातले आहे.
भाद्रपद शुक्ल तृतीयेला येणारा हा हरतालिकेचा सण महिलांसाठी एक आनंदाची पर्वणी असतो.नवीन साडी साजशृंगार करून पूजेसाठी तयार होणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर यावर्षी चिंतेचे सावट दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here