वही हरविल्याबद्दल वडील रागावल्याने सातवीच्या विद्यार्थींनीची आत्महत्या

sucide-by-girl
प्रतीकात्मक चित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) (वृत्तसंस्था) । येथील सातवीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे वडील तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे. ही घटना कटारा हिल्स पोलीस ठाणे हद्दीतील ग्लोबल पार्क सिटी येथे घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

विद्यार्थिनीने सुसाईड नोट टिशु पेपरवर लिहून ठेवले आहे. माझा देह गरजू व्यक्तींना दान करा. तर दुसरा सुसाईड नोट तिने वहीत लिहून ठेवले. त्यात तिने लिहिले की माझी खोली आणि माझा कंप्यूटरसह सर्व सामान दोन्ही लहान भावाला द्या.विद्यार्थिनीने समाजशास्त्र या विषयाची वही हरवली होती. यामुळे तिचे वडील खूप ओरडले होते. त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here