- सार्वजनिक बांधकाम आली जाग
- ठेकेदाराची मुजोरी मात्र कायम
- ठेकेदार रस्त्याकडे फिरकलाच नाही.
शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – येथील तारामती नगरातील खडीकरण व मुरमीकरण रस्त्याचे काम निकृष्ट
झाले असल्याची बातमी गेल्या आठवडाभरापासून बुलंद टाईम्स मध्ये प्रसिद्ध होत आहे.बुलंद पोलीस टाईम च्या दणक्याने प्रशासन जागे झाले खरे परंतु ठेकेदार अजूनही त्या रस्त्याकडे फिरकूनही पाहायला तयार नाही. ठेकेदार हा प्रशासनासाठी काम करतोय का प्रशासन ठेकेदारसाठी काम करतंय? हाच प्रश्न नागरिकांन पुढे उभा राहिलेला आहे. महिनाभरापूर्वी खासदार निधीतून पूर्ण झालेल्या या रस्त्यावर अक्षरश: चिखलाचे साम्राज्य दिसून आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित इंजिनियर मात्र काम व्यवस्थित झाल्याचा कांगावा करीत राहिले व ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला. जर या रस्त्याचे काम निविदाप्रमाणे पूर्ण झालेले आहे तर त्या रस्त्याला पुन्हा डागडुजी करण्याचे कारण काय? संबंधित निकृष्ट कामाची लेखी तक्रार तारामती नगर रहिवाशांनी दिलेली असताना त्याची चौकशी न करता पुन्हा रस्त्यावर मुरुम पसरवत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रस्ता दुरुस्तीचे काम स्वतः न करता ठेकेदार दुसऱ्याकडून करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.लोकशाहीप्रधान असलेल्या या देशात अजूनही असे प्रशासकीय अधिकारी आपली
हुकूमशाही गाजवतांना दिसत आहे. शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात परंतु अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे त्या व्यवस्थित पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो कारण सर्वसामान्य जनतेची हाक ऐकायला कोणीही तयार नसतं. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल.
सदर कामाबाबत रहिवाशांची तक्रार कायम असून संबंधित ठेकेदाराची चौकशी करून रस्त्याचे लेआउट प्रमाणे मोजमाप करून नियमाप्रमाणे काम झाले आहे किंवा नाही याची वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातून प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.







