पनवेल (क्राइम रिपोर्टर गणेश पाटील) | डेरवली गावातील पाटील परिवारातील एक होतकरू तरुण व गावातील पहिले वकील पदवीधर ॲड. श्री. संदेश भोलेनाथ पाटील यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अत्यंत दुःखद निधन झाले.
अत्यंत शांत, मनमिळावू व अभ्यासू स्वभावाचे ॲड. संदेश पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण गावाचा नावलौकिक वाढवला होता. डेरवली गावातून वकिलीची पदवी संपादन करणारे ते पहिलेच तरुण होते. त्यांच्या अकाली निधनाने पाटील परिवारावर तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक व असंख्य मित्रपरिवार असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे अचानक जाणे ही गावासाठी कधीही न भरून येणारी हानी आहे.







